Wakad News : विकेंड रोड फ्री करण्यासाठी वाकड वाहतूक पोलिसांची बेडधडक कारवाई; चार दिवसात केल्या १३२७ कारवाया

वाकड येथील फिनिक्स मॉल व थेरगाव येथील पदमजी पेपर मिल परिसरात धडक कारवाई करण्यात आली.
Traffic police crime on vehicles
Traffic police crime on vehiclessakal

- बेलाजी पात्रे

वाकड - शनिवार-रविवार म्हंटल की वाकडच्या रस्त्यावर जणू वाहनांचा महापूर येतो. बेशिस्त पार्किंगमुळे रस्ते तासनतास जाम होतात. त्यामुळे विकेंडला या रस्त्यावर जायचं म्हंटल्यास अंगावर काटा येतो. यावर उपाय म्हणून व सर्वांचा विकेंड रोड फ्री जाण्यासाठी वाहतूक पोलिसांनी बेधडक कारवाईचे हत्यार उपसले आहे. चार दिवसात तब्बल १३२७ कारवाया करून तब्बल ९ लाख ८० रुपयांचा दंड वसुल केला आहे.

वाकडमध्ये नव्याने झालेल्या मॉल परिसरात हा त्रास सर्वाधिक असल्याने मागच्या आणि ह्या विकेंडला (शनिवार-रविवार) म्हणजेच केवळ चार दिवसात ही कारवाई करण्यात आली आहे. पोलीस उप आयुक्त विशाल गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली वाकड वाहतूक विभागाचे वरिष्ठ निरीक्षक सुनिल पिंजन यांच्या पथकाकडून ही विशेष मोहिम राबविण्यात येत आहे. बेशिस्त वाहने पार्किंग करणाऱ्या व काळ्या काचा लावणाऱ्या वाहन व चालकांवर कारवाई करण्यासाठी हिंजवडी आणि सांगवी पोलीस कर्मचारी व अधिकाऱ्यांची मदत घेण्यात येत आहे.

वाकड येथील फिनिक्स मॉल व थेरगाव येथील पदमजी पेपर मिल परिसरात शनिवारी (ता. ३०) धडक कारवाई करण्यात आली. त्यात ४०६ वाहनांवर कारवाई करून चार लाख ३७ लाखांचा दंड आकारला गेला. फिनिक्स मॉल परिसरात दिवसभरात ३०५ वाहनांवर दोन लाख ५०० रुपये दंड आकारला. चारचाकी वाहनांच्या काळ्या काचांवर कारवाई करण्यात आली.

पहिल्यांदा केलेल्या कारवाईत ५०० रुपये दंड व त्यानंतरही काळ्या काचा आढळून आल्यास त्या वाहनावर १,५०० प्रमाणे दंड आकारला. पदमजी पेपर मिलसमोर बेशिस्तपणे पार्क होणाऱ्या ४७ वाहनांवर कारवाई करून ५० हजारांचा दंड आकारला गेला.

'गोल्डन गाईज'ला जोर का झटका

'गोल्डन गाईज' म्हणून शहरात महागडी आलिशान चारचाकी वाहन घेऊन फिरणाऱ्या वाहनचालकालाही सांगवी वाहतूक पोलिसांनी जोर का झटका दिला. त्या चारचाकी वाहनाला सोन्याची पॉलिश केली असल्याचे सांगण्यात येते तसेच 'गोल्डमन' म्हणून संबंधित वाहनधारकाची ओळख आहे. त्याच्या या 'गोल्डन' चारचाकीत हाय प्रोफाइल व्यक्ती तसेच सेलिब्रिटी नेहमीच दिसून येतात तसेच ही गोल्डन चारचाकी शहरात कुठेही दिसल्यास बघ्यांची गर्दी होते. मात्र, त्याच्याही चारचाकीवरील काळी फिल्म पोलिसांनी हटवली. फॅन्सी नंबरबाबतहीकारवाई केली.

पोलिसांची 'गोल्डन' जुबली कारवाई व्हायरल

शहरात फेमस असलेल्या गोल्डमनच्या गोल्डन चारचाकी वाहनावर पिंपरी-चिंचवड शहरातील सांगवी वाहतूक पोलिसांनी बेधडक कारवाई केली. ती कारवाई करतानाचा व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडियात मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला. वाहतूक पोलिसांच्या या कारवाईची चर्चा शहरात रंगली होती. त्यात काहींनी पोलिसांची 'गोल्डन' जुबली कारवाई अशी कौतुकास्पद शेरेबाजीही केली होती.

प्रतिक्रिया

व्यावसायिक आस्थापनांमुळे बेशिस्त वाहनचालकांचा त्रास होतं असल्याच्या तक्रारी अनेक नागरीकांच्या होत्या. तसेच निवडणूकीच्या अनुषंगानेही ही विशेष मोहिमे राबविण्यात येत आहे. वाकड परिसरात तीन दिवसात फिलमिंगच्या शंभर कारवाया करून एक लाखांचा दंड आकराला आहे ही कारवाई यापुढेही सातत्याने चालूच राहणार आहे. वाहनचालकांनी वाहतूक नियमांचे पालन करून योग्य ती खबरदारी घ्यावी.

- विशाल गायकवाड, पोलिस उपायुक्त, वाहतूक शाखा

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com