esakal | तक्रार कुठं करू, आम्ही हतबल झालोय; पालकांचा संताप
sakal

बोलून बातमी शोधा

school

तक्रार कुठं करू, आम्ही हतबल झालोय; पालकांचा संताप

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पिंपरी : तुमच्या पाल्याला नामांकित शाळेत प्रवेश घ्यायचा आहे? तर मग तुम्हाला वेळप्रसंगी उधारउसनवारी करावी लागेल. कारण, शहरातील काही शाळा अनामत रक्कम स्वीकारत आहेत! शाळा प्रवेश घेताना देणगी (donation) घेणे बेकायदा ठरविले आहे. त्यामुळे पर्याय म्हणून या शाळांनी अनामत रकमेच्या नावाखाली लूट सुरू केली आहे. या विविध शाळांमध्ये ४० ते ७० हजार रुपयांपर्यंतची रक्कम घेतली जात आहे. याबाबत कोठेही तक्रार करण्याची सोय नसल्याने आम्ही हतबल झालो आहोत, असा आरोप पालकांनी केला आहे. (Where to complain we are helpless Anger of parents)

सध्या ऑनलाइन शाळा (online school) सुरू झाल्या असल्या तरी, प्रसिद्ध शाळांमधील प्रवेशाचा हंगाम सुरूच आहे. आणि दुसरीकडे पालकांच्या तक्रारी डोके वर काढू लागल्या आहेत. इतकी वर्षे डोनेशनबाबत तक्रारी होत होत्या. मात्र, यंदा अनामत रक्कम घेण्याबाबत तक्रारी येऊ लागल्या आहेत. याबाबत कोणी तक्रार करण्यास गेल्यावर महाराष्ट्र शैक्षणिक संस्था (शुल्क विनियमन) अधिनियम, २०११मध्ये सुधारणा करण्यात आली आहे. त्यानुसार परतावा असलेली ही रक्कम घेण्यास परवानगी देण्यात आल्याचे शाळांकडून सांगण्यात येत आहे.

हेही वाचा: 'माणूस'कार श्री. ग. माजगावकर पुरस्कार श्रीकांत बहुलकर यांना जाहीर

मनमानीमुळे पालक मेटाकुटीला

प्रवेशावेळी डोनेशन घेण्यास बंदी घातल्याने त्याऐवजी अनामत रक्कम घेण्याची मुभा शाळांना मिळाली आहे. ही रक्कम किती असावी हे ठरवण्याचा अधिकार शाळांना दिली आहे. शैक्षणिक संस्थांकडून कॉम्प्युटर, लायब्ररी, स्पोर्टस्, परीक्षा, ॲक्टिव्हिटी, लॅब, टर्म, सहल, कल्चरल प्रोग्रॅम, ॲन्युअल, इमारत फंड खर्चाच्या नावाखाली अनामत रक्कम आकारली जात आहे. या मनमानी कारभारामुळे पालक मेटाकुटीला आले आहेत.

हेही वाचा: पुण्याच्या मैथिलीची हार्वर्डमध्ये निवड

शालेय साहित्य वापरण्यास पैसे

आंतरराष्ट्रीय अभ्यासक्रम चालविणाऱ्या नामांकित शाळांमध्ये प्रवेश घ्यायचा नाही, असे ठरवले तरी इतर शाळाही ४० ते ७० हजार अनामत रक्कम घेत असल्याचे पालक सांगत आहेत. अनामत रक्कम विज्ञान प्रयोगशाळा, ग्रंथालय, क्रीडा विभाग आदींमध्ये वापरण्यात येणाऱ्या साहित्यासाठी घेतली जाते, असे शाळा सांगतात.

अनामत रक्कमेमुळे पिळवणूक सुरू

अधिनियम, २०११ मध्ये करण्यात आलेल्या सुधारणेनुसार शाळांना अनामत रक्कम ठरविण्याची मुभा मिळाल्यानेच हा मनमानी कारभार सुरू झाल्याचा आरोप पालक संदीप चव्हाण यांनी केला आहे. अशा प्रकारे अनामत रक्कम घेणे ही पालकांची पिळवणूक आहे. राज्य सरकारने २०१७ मध्ये शुल्क विनियमन कायद्यात सुधारणा करण्याची मागणी पिंपरी- चिंचवड पालक संघटनेने केली आहे.

loading image