लोणावळ्यात वाढत्या कोरोनाबाधितांमुळे भाजपने प्रशासनास धरले धारेवर

लोणावळ्यात वाढत्या कोरोनाबाधितांमुळे भाजपने प्रशासनास धरले धारेवर

लोणावळा (पुणे) : लोणावळा हद्दीत कोविड रुग्णांची वाढती संख्या आणि मृत्युदरात होत असलेली वाढ, या पार्श्वभूमीवर लोणावळा शहर भाजपतर्फे नगरपरिषद प्रशासनास धारेवर धरले. भाजपचे शहराध्यक्ष रामविलास खंडेलवाल यांच्या मार्गदर्शनाखाली भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी सोमवारी (ता. 31) मुख्याधिकारी रवी पवार यांना निवेदन देत जाब विचारण्यात आला. 

पिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

ऑगस्टमध्ये लोणावळा नगरपरिषद हद्दीत कोरोना रुग्णांची संख्या कमालीची वाढ झाली. रुग्णसंख्या अडीचशेच्या वर गेली आहे. मृत्युदरातही वाढ होत सरासरी साडेचारच्या वर गेल्याने चिंता वाढली आहे. यामुळे प्रशासनाने पुन्हा एकदा तातडीच्या उपाययोजना कराव्या, अशी मागणी भाजपतर्फे करण्यात आली. यावेळी ज्येष्ठ नेते अरविंद कुलकर्णी, नगरसेवक देविदास कडू, वृंदा गणात्रा, रचना सिनकर, महिला आघाडी अध्यक्षा योगीता कोकरे, हर्शल होगले, अरुण लाड, दीपक कांबळे आदी उपस्थित होते. शहराध्यक्ष रामविलास खंडेलवाल म्हणाले, "नगराध्यक्षा सुरेखा जाधव, उपनगराध्यक्ष श्रीधर पुजारी यांच्या नेतृत्वात चार महिने शहरात कोरोनाचा शिरकाव थोपविण्यात आला. मात्र, जुलैच्या मध्यापासून विशेषतः ऑगस्टमध्ये बाधीत रुग्णांची संख्या झपाट्याने वाढली. प्रशासनाच्या कामकाजात कमालीची ढिलाई दिसून येत आहे.'' रुग्ण आढळताच घरातील कुटुंबीयांचे सक्तीने विलगीकरण व चाचण्या करणे आवश्‍यक असताना प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याचे चित्र आहे. तसेच, बाधित रुग्णांचा परिसर सील करून प्रतिबंधीत क्षेत्र म्हणून जाहीर करणे आवश्‍यक असूनही तसे होत नाही, असे खंडेलवाल म्हणाले. 

कोरोनाबाधित रुग्णाला अत्यावश्‍यक सेवा, उपचार, रुग्णवाहिका त्वरित न मिळाल्याने जीवितहानी होत आहे. लोणावळ्यात नुकतेच संजीवनी हॉस्पिटल येथे स्पेशल कोविड रुग्णालय सुरू झाले आहे. मात्र, या ठिकाणी अत्यावश्‍यक सुविधांसह पुरेसे व्हेंटिलेटर उपलब्धता नाही. त्यामुळे देखील जीवितहानीचा धोका वाढत आहे. तरी या सर्व बाबींचा विचार करून या रुग्णालयाला व्हेंटिलेटर, इंजेक्‍शन व औषधांचा पुरेसा साठा उपलब्ध करावा, अशी मागणी भाजपतर्फे करण्यात आली. नगरपरिषदेने स्वबळावर झालावाडी येथे कोविड केअर सेंटर सुरू करून लोणावळेकरांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र, अपुऱ्या साधनांअभावी तेथेही मर्यादा आल्या आहेत. ऑक्‍सिजन, व्हेंटिलेटर आदी जीवरक्षक साधनांच्या कमतरतेमुळे रुग्णांची गैरसोय होत असल्याचे खंडेलवाल म्हणाले. 

मृतदेह खंडाळा शवागारात पडून 

कोरोनाबाधित मृत रुग्णावर तातडीने अंत्यसंस्कार होणे आवश्‍यक असताना खंडाळा प्राथमिक आरोग्य रुग्णालयातील शवागारात मृतदेह ठेवण्यात आला आहे, असा गंभीर आरोप शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख मच्छिंद्र खराडे यांनी केला. यामुळे नागरिकांची सुरक्षा धोक्‍यात येत आहे. एखाद्या तातडीच्या मृतदेहांचे शवविच्छेदन कसे करणार, असा सवाल उपस्थित करत खराडे यांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे. 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com