esakal | दहा रुपयांत कुठेही प्रवास पिंपरी-चिंचवडमध्ये का नाही?
sakal

बोलून बातमी शोधा

Raju Misal

दहा रुपयांत कुठेही प्रवास पिंपरी-चिंचवडमध्ये का नाही?

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पिंपरी - पीएमपी बसमधून (PMP Bus) अवघ्या दहा रुपयांत (Ten Rupees) पुणे शहरात (Pune City) कुठेही फिरा, ही योजना पुणे महापालिका (Pune Municipal) राबवत आहे. जे पुण्याच्या पदाधिकाऱ्यांना जमू शकते ते पिंपरी-चिंचवडच्या (Pimpri Chinchwad) सत्ताधारी पदाधिकाऱ्यांना का जमू नये, असा सवाल विरोधी पक्षनेता राजू मिसाळ (Raju Misal) यांनी केला आहे. (Why Not Travel Anywhere in Pimpri Chinchwad for Ten Rupees Raju Misal)

याबाबत महापौर उषा ढोरे यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, की पीएमपी पुणे व पिंपरी-चिंचवड शहरातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेसाठी कार्यरत आहे. आपली महापालिका आपला हिस्सा पीएमपीकडे वेळोवेळी देत असते, तरीही विलीनीकरण झाल्यापासूनच आपल्या शहरावर बसमार्ग असो अथवा पूर्वाश्रमीच्या पीसीएमटीच्या कर्मचाऱ्यांवर पदोन्नती अथवा बदल्यांबाबत कायमच अन्याय सुरू आहे. आताही पुणे शहरासाठी दहा रुपयांत कुठेही दिवसभर फिरा ही योजना सुरू केली आहे.

हेही वाचा: 55 आमदारांमध्ये मुख्यमंत्री बनू शकतो, तर 50 नगरसेवकांत महापौर का नाही? - राऊत

पुण्यातील पदाधिकारी व प्रशासनास ही योजना राबविता येते, तर आपल्या महापालिकेला ती का राबविता येत नाही? आपले सत्ताधारी, पदाधिकारी, प्रशासन नागरिकांना ‘पे अँड पार्क’द्वारे नागरिकांना वेठीस व भुर्दंड बसविणाऱ्या योजना राबविण्यात धन्यता मानत आहेत. जे पुण्याच्या पदाधिकाऱ्यांना जमू शकते ते आपल्या सत्ताधारी पदाधिकाऱ्यांना का जमू नये? आपल्या शहरासाठी ही योजना तातडीने सुरू करावी, असेही निवेदनात म्हटले आहे.

loading image