esakal | शहरात विनापरवाना औद्योगिक कारखान्यांची सर्रासपणे सॅनिटायझर विक्री
sakal

बोलून बातमी शोधा

Sanitizer Selling

शहरात विनापरवाना औद्योगिक कारखान्यांची सर्रासपणे सॅनिटायझर विक्री

sakal_logo
By
सुवर्णा गवारे-नवले

पिंपरी - पिंपरी-चिंचवड शहरात (Pimpri Chincwad City) कोरोनाकाळात (Corona) विनापरवाना औद्योगिक कारखान्यांनी Unlicenced Industrial Factory) सर्रासपणे सॅनिटायझर विक्री (Sanitizer Selling) सुरू केली आहे. औद्योगिक सुरक्षा व आरोग्य विभाग, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, महापालिका अग्निशमन विभाग, तसेच एमआयडीसीकडून कोणत्याही प्रकारची परवानगी (Permission) न घेता सॅनिटायझर बनविले जात आहे. कंपन्या नोंदणीकृत नसून, छुप्या पद्धतीने सॅनिटायझर बनवून बड्या कंपनीला विकले जात असल्याचे भोसरी, तळवडे, चाकण एमआयडीसी परिसरातील इतर उद्योजकांनी सांगितले आहे. (Widespread Sanitizer Sales of Unlicensed Industrial Plants)

उरवडेमध्ये घडलेल्या घटनेच्या पार्श्वभूमीवर पिंपरी-चिंचवड औद्योगिक कंपन्यांची सुरक्षेबाबत माहिती घेतली असता कंपन्यांची सुरक्षा रामभरोसे असल्याचे समोर आले आहे. पिंपरी-चिंचवड औद्योगिक परिसरात लहान मोठ्या मिळून पाच हजारांवर कंपन्या आहेत. कोरोनाकाळात प्रत्येकाने कोरोनाशी संबंधित उद्योग-व्यवसायात गुंतवणूक केली आहे. परंतु, यासाठी लागणाऱ्या परवानग्या न काढता नियमांची पायमल्ली केली आहे. कंपन्यांमध्ये तयार होणाऱ्या इंजिनिअरिंग उत्पादनाव्यतिरिक्त कोणत्याही रासायनिक अंश असलेल्या प्रॅाडक्टसाठी अधिकृत परवाना असणे गरजेचे आहे. या वस्तूंच्या साठवणुकीसाठी लागणारे गोडाउन, तसेच कर्मचाऱ्यांची सुरक्षा, सुरक्षा वस्तूंचा वापर जसे, हॅंड ग्लोव्हज, ॲप्रन, बूटसह वस्तूंच्या साठवणुकीत योग्य ते अंतर पाळले आहे का, याची तपासणी औद्योगिक सुरक्षा विभागाकडून होणे गरजेचे आहे.

हेही वाचा: महापालिका आयुक्तांच्या नावाने फेसबुकवर बनावट खाते

एमआयडीसी परिसरात अरुंद रस्ते असल्याने या भागात अग्निशमन वाहने वेळेत पोहोचणे दुरापास्त आहे. कंपन्यांमध्ये कोणत्याही प्रकारचे फायर सुरक्षेची साधने नाहीत. केवळ शहरातील नामाकिंत कंपन्यांमध्ये ऑडिट होऊन नियमांचे पालन केले जात आहे. परंतु, लहान कंपन्यांमध्ये विनापरवाना पेव जोरदार फुटले आहे. कित्येक रबर, प्लॅस्टिक व विविध स्पेअर पार्टच्या कंपन्यांमध्ये ज्वलनशील पदार्थांचा वापर मोठ्या प्रमाणात केला जात आहे. याचे ऑडिट काटेकारेपणे होणे अत्यावश्यक आहे. एमआयडीसीमध्ये स्वतंत्र अग्निशमन यंत्रणा नसल्याने महापालिकेच्या अग्निशमन केंद्रावर अवलंबून राहण्याची वेळ एमआयडीसीवर येत आहे. त्यामुळे, एमआयडीसीतील कंपन्यांची सुरक्षा नेमकी कोणाच्या हातात आहे, हा मोठा प्रश्न उद्‌भवला आहे.

एसटीपी व डक कलेक्टिंगचे काम आम्ही पाहतो. कंपन्यांच्या सुरक्षेचे काम औद्योगिक सुरक्षा संचालनालय व आरोग्य विभाग पाहतो. हवा व पाण्यातील प्रदूषित घटक आम्ही पाहतो. औद्योगिक सुरक्षा विभागाची स्वतंत्र एसओपी असते, असे प्रदूषण नियंत्रण मंडळाचे किरण हसबनीस यांनी सांगितले.

सुरक्षेचीच टोलवाटोलवी

महापालिका, एमआयडीसी, प्रदूषण नियंत्रण मंडळ व औद्योगिक सुरक्षा विभागाच्या जबाबदाऱ्या निश्चित असूनही प्रत्येक विभागामध्ये टोलवाटोलवी सुरू आहे. या शासकीय यंत्रणांच्या निष्काळजीपणामुळे कंपन्यांचे फावले आहे. ऑडिट व परवाना या बाबी काटेकोरपणे झाल्यास जीवितहानी होण्याचा प्रश्न उद्भवणार नाही.

loading image