esakal | प्रदूषणविरहित वाहन उत्पादनास बळ देणार; अजित पवार
sakal

बोलून बातमी शोधा

ajit pawar

प्रदूषणविरहित वाहन उत्पादनास बळ देणार; अजित पवार

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पिंपरी : ‘‘पिंपरी-चिंचवड (pimpri chinchawad) एमआयडीसी (MIDC)आणि पुणे (Pune) जिल्हा ॲटोहब म्हणून ओळखला जातो. आता इलेक्ट्रिक वाहनांचे हब म्हणून नवीन ओळख निर्माण होईल. प्रदूषण विरहित इलेक्ट्रिक वाहनांचे (electornik vehicle) उत्पादन मोठ्या प्रमाणात व्हावे यासाठी केंद्र व राज्य सरकार विविध सवलती व अनुदान देण्यासाठी प्रयत्नशील आहेत,’’ अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली. (Will boost pollution-free vehicle production Ajit Pawar)

पिंपरी-चिंचवड येथे फिटवेल मोबिलिटी कंपनीच्या तीनचाकी इलेक्ट्रिक वाहन वितरण प्रसंगी ते बोलत होते. यावेळी कंपनीचे अध्यक्ष चैतन्य शिरोळे, संचालक ए. शशांक, उद्योजक जगदीश कदम, आयुक्त राजेश पाटील, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे, विरोधी पक्षनेते राजू मिसाळ, नगरसेवक नाना काटे, श्याम लांडे आदी उपस्थित होते.

हेही वाचा: कात्रजमध्ये राज्यातील पहिले शेकरू प्रजनन आणि रानमांजर केंद्र

पवार म्हणाले, ‘‘राज्य सरकारच्या वतीने या क्षेत्रासाठी काय सुविधा व सवलती देता येतील या बाबत मी आणि पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांच्याबरोबर चर्चा केली आहे. लवकरच याचे धोरण निश्चित होईल. राज्यात २०२५ पर्यंत नोंदणी होणाऱ्या वाहनांमध्ये दहा टक्के वाटा इलेक्ट्रिक वाहनांचा राहील, असे नियोजन करण्यात येत आहे. यामध्ये दुचाकी दहा टक्के, तीन चाकी वीस टक्के आणि चार चाकी पाच टक्के वाहनांचा समावेश असेल. पुणे, मुंबई, सोलापूर, औरंगाबाद, नागपूर, नाशिक, अमरावती या शहरांत सार्वजनिक वाहतुकीचे पंचवीस टक्के विद्युतीकरण करणार आहोत. पुणे-मुंबई, मुंबई-नागपूर, मुंबई-नाशिक, पुणे-नाशिक या मार्गांवर प्राधान्याने सरकारी व खासगी पद्धतीने इलेक्ट्रिक चार्जिंग सुविधा मोठ्या प्रमाणात उभारणार आहोत. यासाठी अनुदान व सवलती देण्याचे धोरण लवकरच जाहीर करण्यात येईल.’

loading image