esakal | लष्करी हद्दीत बेकायेशीररित्या वास्तव्य; दापोडीत महिलेला अटक 
sakal

बोलून बातमी शोधा

लष्करी हद्दीत बेकायेशीररित्या वास्तव्य; दापोडीत महिलेला अटक 

लष्करी हद्दीत बेकायेशीररित्या वास्तव्य केल्याप्रकरणी भोसरी पोलिसांनी महिलेला अटक केली आहे.

लष्करी हद्दीत बेकायेशीररित्या वास्तव्य; दापोडीत महिलेला अटक 

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

पिंपरी : लष्करी हद्दीत बेकायेशीररित्या वास्तव्य केल्याप्रकरणी भोसरी पोलिसांनी महिलेला अटक केली आहे. हा प्रकार दापोडीतील सैन्य अभियांत्रिकी
महाविद्यालयातील (सीएमई) लष्कराच्या सरकारी क्वाटर्समध्ये घडला. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

एलीसा मनोज पान्डे (वय 26, रा. लुंबिनी, नेपाल, सध्या-जेन्टस ऑफिसर्स क्वॉटर्स, सी.एम.ई. दापोडी) असे अटक केलेल्या महिलेचे नाव आहे. 23 मार्च
2020 रोजी आरोपी महिला दापोडीतील एका शॉपिंग मॉलजवळच्या भिंतीवरून उडी मारून सीएमईच्या हद्दीत शिरली. 23 मार्चपासून ही महिला जेन्टस
ऑफिसर्स क्वाटर्समध्ये बेकायदेशीरपणे राहत आहे. 

पिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

दरम्यान, लष्करी मालमत्तेस व अधिकाऱ्यांच्या जीवितास धोका निर्माण करण्यासाठी ही महिला त्याठिकाणी राहत असावी. त्यामुळे पोलिसांनी तिच्यावर गुन्हा दाखल करून तिला अटक केली आहे. भोसरी पोलिस अधिक तपास करीत आहेत.