पुराने हिसाब और बाकी है...वो भी कर लेंगे..; व्हॉट्सॲप स्टेटस ठेऊन महिलेला धमकी | Crime | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पुराने हिसाब और बाकी है...वो भी कर लेंगे..; व्हॉट्सॲप स्टेटस ठेऊन महिलेला धमकी
पुराने हिसाब और बाकी है...वो भी कर लेंगे..; व्हॉट्सॲप स्टेटस ठेऊन महिलेला धमकी

पुराने हिसाब और बाकी है...वो भी कर लेंगे..; व्हॉट्सॲप स्टेटस ठेऊन महिलेला धमकी

पिंपरी - 'पुराने हिसाब और बाकी है वो भी कर लेंगे..." असे म्हणत तसा व्हॉट्सॲप स्टेटस ठेवून वल्लभनगर एस. टी. आगारातील महिला वाहकाला धमकी देण्याचा प्रकार गुरुवारी (ता. १८) रात्री आठच्या दरम्यान घडला.

कर्मचा-यांच्या म्हणण्यानुसार, गेल्या दहा दिवसांपासून वल्लभनगर आगारात आमचा संप शांततेत सुरू आहे. बुधवारी (ता. १७) रात्री साडेअकराच्या सुमारास आगारातील एका वाहतूक नियंत्रकाने महिला वाहकाच्या व्हॉट्सॲपवर तिला निलंबित केल्याचा आदेश पाठवला. वास्तविक, वाहतूक नियंत्रकाला असे आदेश पाठविण्याचे कोणतेही अधिकार नाहीत. दुसऱ्या दिवशी आम्ही सर्व कर्मचाऱ्यांनी या घटनेविषयी एसटी प्रशासनाकडे तक्रार केली. तसेच, त्या वाहतूक नियंत्रकावर कारवाई करण्याची विनंती केली.

यावर कोणतीही कारवाई न झाल्याने कर्मचाऱ्यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात गुरुवारी तक्रार दिली. त्यानंतर वाहतूक नियंत्रकाने सर्व कर्मचाऱ्यांसमोर माफी मागितली. परंतु, त्यानंतर काही वेळातच त्याने बंदूक हातात घेऊन त्या महिलेला उद्देशून व्हॉट्सॲपवर स्टेटस ठेवले. त्यामुळे संपकरी कर्मचाऱ्यांमध्ये एकच गोंधळ उडाला. सर्वजण रात्री आठला आगारात जमले. गोंधळ वाढत गेला. याची माहिती समजताच पोलिसांनी संपाच्या ठिकाणी धाव घेतली. सर्वांना शांत राहण्याचे आवाहन केले. हा सर्व प्रकार जिल्हा सुरक्षा अधिकारी यांनाही कळवला. तेही घटनास्थळी आले. परंतू, अद्यापपर्यंत कारवाई झाली नाही. घटनास्थळी पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

हेही वाचा: पुणेकरांवर पाणी कपातीचे संकट; महिन्यातून दोन दिवस पाणी बंदचा प्रस्ताव

कर्मचारी म्हणाले, 'आम्ही सर्वजण निलंबित कर्मचाऱ्यांच्या पाठीशी आहोत. वास्तविक ज्या नियंत्रकाने महिलेला संदेश पाठवला. त्याची पत्नी चिंचवड पोलीस ठाण्यात कॉन्स्टेबल आहे, त्यामुळे त्याने हे धाडस केले. कर्मचाऱ्यांवर कोणतीही दया न दाखवता एका पोलीस कॉन्स्टेबलच्या पतीवर सर्वजण मेहरबान झाले आहेत. जोपर्यंत कारवाई होत नाही तोपर्यंत आम्ही शांत बसणार नाही. महिला वाहकाच्या जीवाला धोका आहे, हे पोलिसांनी लक्षात घ्यायला हवे. उद्यापर्यंत आम्ही दिलेल्या तक्रारीची नोंद पोलिसांनी न घेतल्यास आंदोलन करणार आहोत."

आगार व्यवस्थापक एस जी गोसावी म्हणाले, 'आगारामध्ये मनुष्यबळ कमी असल्याने वाहतूक नियंत्रकाला मोबाईल नंबर देऊन आदेश पाठवण्यास सांगितले, यापुढे प्रशासनच आदेश पाठवेल. सर्व प्रकरण मिटले आहे. स्टेटस काढला आहे."

loading image
go to top