पिंपरी - कोरोना विषाणूंच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे आयटी कंपन्यांच्या कामात खंड पडू नये, म्हणून सुरु करण्यात आलेली कर्मचाऱ्यांसाठी सुरु केलेली वर्क फ्रॉम होम संकल्पना यशस्वी झाली आहे. हिंजवडी, तळवडे आयटी पार्कमधील दोन लाख 35 हजार 633 कर्मचारी त्या अंतर्गत काम करत आहेत.
ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप
कोरोनाला सुरुवात झाल्यानंतर काही दिवसांमध्येच आयटी कंपन्यांनी कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होमचा ऑप्शन देत घरातून काम करण्याची परवानगी दिली. त्यामुळे कंपन्यांची कामे सुरळीतपणे सुरु आहेत.
हिंजवडी आयटी पार्क परिसरात 181 कंपन्या असून त्यामध्ये 145 मोठ्या आणि 36 लहान कंपन्यांचा समावेश आहे. याव्यतिरिक्त हिंजवडी औद्योगिक वसाहतींच्या बाहेरच्या भागात खासगी जागेत असणाऱ्या कंपन्यांची संख्या 100 च्या आसपास आहे. हिंजवडी आयटी पार्कमधील कंपन्यांमधे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची संख्या तीन लाख 59 हजार असून आयटी पार्क बाहेरच्या क्षेत्रात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची संख्या दीड लाखाच्या आसपास आहे. सध्या या दोन्ही ठिकाणांमधील दोन लाख दहा हजार कर्मचारी हे वर्क फ्रॉम करत आहेत. याखेरीज तळवडे आयटी पार्कमधील 16 हजार 423 आणि खराडी आयटी पार्कमधील नउ हजार 210 कर्मचारी घरातूनच काम करत आहेत.
मावळवासीयांना ज्याची भीती होती, अखेर तेच झालं...
उर्वरित कर्मचाऱ्यांचे या कारणांमुळे बंद आहे काम...
दरम्यान, उर्वरित दोन लाख 99 हजार आयटी कर्मचाऱ्यांचे काम विविध कारणांमुळे बंद आहे. त्यामध्ये काही कंपन्यांकडे प्रोजेक्ट नाहीत, लॉकडाउनमुळे काहींना वर्क फ्रॉम होमसाठी आवश्यक असणाऱ्या लॅपटॉप आणि अन्य सुविधा कर्मचाऱ्यांना देता आलेल्या नाहीत. काहीजणांनी कंपनी बंद ठेवल्यामुळे कर्मचारी घरीच आहेत, तर काहीजण सुटीवर आहेत.
सोमवारपासून अनेक कंपन्या सुरु होणार....
हिंजवडी आयटी पार्कमधील आयटी कंपन्यांना मर्यादित मनुष्यबळामध्ये कामकाज सुरु करण्यास परवानगी देण्यात आली आहे, त्यानुसार बुधवारी (6) रोजी या भागात 18 कंपन्या सुरु झाल्या, त्यामध्ये इन्फोसिस, विप्रो या नामांकित कंपन्यांचा समावेश आहे. आयटी पार्कमध्ये पहिल्या दिवशी 248 कर्मचारी कामावर होते. येत्या सोमवारपासून बहुतेक आयटी कंपन्यांचे कामकाज सुरु होणार आहे.
इथल्या आयटी कंपनी सुरु होणार नाहीत....
तळवडे आणि खराडी भागातील आयटी कंपन्यांना कामकाज सुरु करता येणार नाही. कारण म्हणजे तळवडे परिसर हा पिंपरी-चिंचवड महापालिका तर खराडीचा परिसर हा पुणे महापालिका भागात येतो. रेड झोनमध्ये असणाऱ्या हा भाग कन्टेन्मेंट झोनमधे येतो. त्यामुळे याठिकाणी आयटी कंपन्यांना कामकाज सुरु करता येणार नसल्याचे एमआयडीसीचे प्रादेशिक अधिकारी संजीव देशमुख यांनी सांगितले.
|