वाकड : रावेतला योग दिंडीतून आरोग्य निरोगी ठेवण्याचा धडा

स्वास्थ्य योग केंद्र यांच्या वतीने भव्य योग दिंडी सोहळा २०२२ या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. योग दिंडीतून आरोग्याची काळजी घेत ते निरोगी ठेवण्याचा धडा देण्यात आला.
Yoga Dindi 2022 health awareness D Y Patil Road in Ravet wakad
Yoga Dindi 2022 health awareness D Y Patil Road in Ravet wakadsakal

वाकड : रावेत येथील संपूर्ण स्वास्थ्य योग केंद्र यांच्या वतीने भव्य योग दिंडी सोहळा २०२२ या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या योग दिंडीतून आरोग्याची काळजी घेत ते निरोगी ठेवण्याचा धडा देण्यात आला. डी. वाय. पाटील रस्ता येथून पायी दिंडीला सुरुवात झाली व दत्त मंदिर शिंदे वस्ती या ठिकाणी दिंडीची सांगता झाली. सकाळी ७ ते १० या वेळेत ही पायी दिंडी मोठया उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाली. यात भजनी मंडळींच्या टाळ, मृदंगाच्या गजरातील सुमधुर भजनांनी आणखी रंगत आणली.

आनंददायी वातावरणातील दिंडीत योग प्रात्यक्षिकांचे सादरीकरण झाले ते पाहण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली होती. वृक्ष संवर्धन व स्वास्थ योग केंद्र ग्रुप मधील सर्व सदस्य व मान्यवरांची उपस्थिती होती. योगाचार्य महारुद्र शेटे, संपूर्ण स्वास्थ योग केंद्र यांनी आयोजन केले. निसर्ग प्रेमी संजय रोकडे व सहकारी मित्र परिवाराचे सहकार्य लाभले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com