६० हजार ग्राहकांना आडवं गेलं 'मांजर'; भोसरी-आकुर्डीला अंधारात राहण्याची वेळ

६० हजार ग्राहकांना आडवं गेलं 'मांजर'; भोसरी-आकुर्डीला अंधारात राहण्याची वेळ

पुणे: भोसरी व आकुर्डीमधील घरगुती, वाणिज्यिक व औद्योगिक ग्राहकांसह सुमारे ६० हजार ग्राहकांचा वीजपुरवठा बंद झाला होता. दरम्यान, महापारेषणच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी युध्दपातळीवर कामे करून वीजपुरवठा तात्काळ सुरळीत केला आहे. मा. ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत, प्रधान सचिव (ऊर्जा) तथा अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक श्री. दिनेश वाघमारे यांनी वेळोवेळी याबाबत माहिती घेऊन वीजपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी आवश्यक त्या सूचना व मार्गदर्शन केलंय. मात्र, हा वीजपुरवठा ज्या कारणामुळे बंद झाला, ते ऐकून तुम्हीही हैराण व्हाल.

६० हजार ग्राहकांना आडवं गेलं 'मांजर'; भोसरी-आकुर्डीला अंधारात राहण्याची वेळ
पटोले फोन टॅपिंग प्रकरणी आक्रमक; रश्मी शुक्लांच्या विरोधात अब्रूनुकसानीचा दावा

महापारेषणच्या भोसरी उपकेंद्रात एका मांजरामुळे सकाळी सहाच्या सुमारास तांत्रिक बिघाड होऊन भोसरी, आकुर्डी व परिसरातील काही भागात वीजपुरवठा खंडित झाला आहे. महापारेषणच्या भोसरी येथील २२० के. व्ही. अति उच्च दाब उपकेंद्रातील १०० एम.व्ही.ए. क्षमतेच्या विद्युत रोहित्रामध्ये सकाळी सहाच्या सुमारास २२ के. व्ही.च्या यार्डमधील चालू वीज उपकरणावर मांजर चढल्यामुळे हा बिघाड झाला होता. त्यामुळे भोसरी, आकुर्डी व परिसरात वीजपुरवठा खंडित झाला. दरम्यान, २२० के. व्ही. उपकेंद्रातील ७५ एम.व्ही.ए. क्षमतेच्या विद्युत रोहित्रावर महापारेषणकडून वीजपुरवठा सुरळीत करण्यात आला. उर्वरित वीजपुरवठा हा २२० के. व्ही. भोसरी-२ उपकेंद्रातून सुरळीत करण्यात आला.

६० हजार ग्राहकांना आडवं गेलं 'मांजर'; भोसरी-आकुर्डीला अंधारात राहण्याची वेळ
भोसरी, आकुर्डीतील ६० हजार ग्राहकांचा वीजपुरवठा ठप्प

महापारेषण कंपनीच्या २२० के. व्ही. अति उच्च दाब भोसरी-१ उपकेंद्रामध्ये सध्यस्थितीत १०० एम.व्ही.ए. क्षमतेचे एक व ७५ एम.व्ही.ए. क्षमतेचा एक असे एकूण दोन विद्युत रोहित्रे आहेत. या दोन विद्युत रोहित्राव्दारे महावितरणच्या एकूण २६ वीजवाहिन्यांना वीजपुरवठा करण्यात येतो. मात्र, यातील १०० एम.व्ही.ए.च्या रोहित्रामध्ये सकाळी सहाच्या सुमारास २२ के. व्ही. यार्डमधील चालू वीज उपकरणावर मांजर चढल्यामुळे बिघाड झाला. परिणामी, प्रामुख्याने भोसरी एम.आय.डी.सी., भोसरी परिसर, आकुर्डी परिसरात चक्राकार पध्दतीने भारनियमन करावे लागले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com