Talegaon Station Crime : चाकूने भोकसून तळेगावात तरुणाचा खून

मुंबई-पुणे महामार्गावर निलया सोसायटीजवळ मित्रांसह वाट पाहत थांबलेल्या तरुणाला ४ अनोळखी इसमांनी मारहाण करुन चाकुने भोकसून खून केल्याची घटना रविवारी घडली.
Krishna Shelake
Krishna ShelakeSakal

तळेगाव स्टेशन - मुंबई-पुणे महामार्गावर निलया सोसायटीजवळ मित्रांसह वाट पाहत थांबलेल्या तरुणाला ४ अनोळखी इसमांनी मारहाण करुन चाकुने भोकसून खून केल्याची घटना रविवारी (ता. ०६) रात्री आठ वाजण्याच्या सुमारास तळेगाव दाभाडे येथे घडली.

कृष्णा कैलास शेळके (२०, राऊतवाडी, करुंज, पवनानगर, ता. मावळ, जि. पुणे) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी मयताचा मित्र धृव नवनाथ बोऱ्हाडे (१७, राऊतवाडी, करुंज, पवनानगर, ता. मावळ, जि. पुणे) याने तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरुन ४ अज्ञात इसमांविरुद्ध तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

रविवारी (ता. ०५) रात्री आठ वाजण्याच्या सुमारास फिर्यादी धृव नवनाथ बोऱ्हाडे, त्याचे मित्र करण मधुकर लगड आणि कृष्णा कैलास शेळके (सर्व राहणार राऊतवाडी, पवनानगर, ता. मावळ, जि. पुणे) हे तिघे जण तळेगाव दाभाडे येथे पिक्चर पाहण्याकरीता जात होते. दरम्यान कृष्णा शेळके याने फोन केल्याने तृतीय पंथीयांना भेटण्याकरीता निलया सोसायटीजवळील ते अंधारात वाट पाहत थांबले होते.

त्याठिकाणी आलेल्या ४ अनोळखी इसमांनी इथे का थांबला आहे? असे विचारले. त्यावर कृष्णा शेळके याने कुठं काय असंच थांबलो आहे, असे म्हणाल्याचा राग आल्याने अंगाने सडपातळ, अंगात पांढ-या रंगाचा शर्ट परिधान केलेल्या एका अनोळखी इसमाने कृष्णा शेळके याच्या कानाखाली मारली. त्यांच्यात झटापट सुरु झाल्याने चार अनोळखी इसमांनी हाता-बुक्क्यानी मारहाण केली. त्यातील एकाने चाकू काढुन चाकुने कृष्णा शेळके याच्या छातीत, पाठीत आणि डोक्यात भोकसून त्यास ठार मारले.

याबाबत पोलिसांना ११२ नंबरवरून कॉल गेल्यानंतर तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्याचे गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किशोर पाटील आणि सहकाऱ्यांनी त्वरित घटनास्थळी धाव घेत रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या युवकाला सोमाटणे येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात केले. मात्र, डॉक्टरांनी त्याला उपचारापूर्वीच मयत घोषित केले. पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाचे दरोडा पथक, गुन्हे शाखा युनिट ५ ची पथके आरोपींचा कसून शोध घेत आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com