'71 दिवसांत 1.23 लाख मृत्यू तरीही माहिती लपविली जात आहे'

आता मृत्यूची वाढणा-या संख्येबाबत काॅंग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी देखील चिंता व्यक्त करुन हे सर्व भयंकर असल्याचे म्हटलं आहे.
Dead body
Dead body system

सातारा : देशात गुजरात मॉडेलची (gujarat model) चर्चा सुरू असताना आता याला आदर्श मॉडेल म्हणायचं का असा विचार करायला लावणा-या घटना गेल्या काही दिवसांत गुजरातमधील विविध जिल्ह्यांत घडल्या. काॅंग्रेसचे ज्येष्ठ नेते आमदार पृथ्वीराज चव्हाण (prithviraj chavan) यांनी आज (शुक्रवार) गुजरात माॅडेलबाबत शंका वाटत असल्याचे ट्विट केले आहे. satara marathi news prithviraj chavan criticises gujarat model coronavirus

आमदार चव्हाण यांनी गुजरातमधील काही वृत्तपत्रांचे छायाचित्र पाेस्ट करुन गुजरात माॅडेलबाबत आश्चर्य व्यक्त केले आहे. गुजरातमध्ये काेराेनामुळे 71 दिवसांत 1.23 लाख मृत्यू झाले आहेत. याचा अर्थ दिवसाला 1744 मृत्यू झाले आहेत. त्यामुळे गुजरात माॅडेलची जेवढी चर्चा झाली त्यापेक्षा तेथील कामगिरी निश्चितच याेग्य नाही असे संख्येवरुन दिसून येत आहे. त्यामुळे हा प्रकार माहिती लपविण्याचा म्हणावा लागेल आणि जनतेत गैरसमज पसरविला जात असल्याचे नमूद केले आहे.

Dead body
'Narendra Modi देशातील सर्वात मोठी बिनकामाची मालमत्ता'

कोरोना रुग्णांची संख्या वाढू लागल्याने गुजरात उच्च न्यायालयाने देखील विजय रुपाणी सरकारला काही दिवसांपुर्वी धारेवर धरले आहे. सध्या देशात सर्वात जास्त लस पुरवठा गुजरातला होत असल्याचे माध्यमात प्रसिद्ध होणाऱ्या आकडेवारीवरून दिसून येते. त्यानंतरही कोरोना रुग्णसंख्या वाढत असल्याने गुजरात उच्च न्यायालयाने सरकारला खडे बोल सुनावले हाेते. गुजरात मॉडेलची देशभरात चर्चा सुरू असताना सरकारच्या कामगिरीमुळे तेथील जनता चिंताग्रस्त होत चालली आहे. आता मृत्यूची वाढणा-या संख्येबाबत काॅंग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी देखील चिंता व्यक्त करुन हे सर्व भयंकर असल्याचे म्हटलं आहे.

Dead body
कोरोनायुद्धात भारताची जगाला दिशा !

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com