
Bollywood Entertainment News : ऑस्कर विजेते संगीतकार ए आर रहमान त्यांची पत्नी सायरा बानू पासून जवळपास 29 वर्षांनंतर विभक्त झाले. सोशल मीडियावर त्यांनी पोस्ट शेअर करत घटस्फोट घेत असल्याचं जाहीर केलं. त्यांच्या या निर्णयाने अनेकांना धक्का बसला आहे. ए आर रहमान यांनी 1995 मध्ये सायरा यांच्याशी लग्न केलं होतं आणि त्यांना तीन मुलं आहेत. भारतातील आघाडीचे संगीतकार असलेल्या ए आर रहमान यांच्या एकूण संपत्तीविषयी जाणून घेऊया.