

AADESH BANDEKAR ON DIGAMBAR NAIK
ESAKAL
'वस्त्रहरण' , 'फु बाई फु' सारखी नाटकं आणि कार्यक्रम गाजवणारा मराठी मातीतला कलाकार दिगंबर नाईक यांनी नुकतीच राजश्री मराठीला मुलाखत दिली. यात बोलताना मालवणी माणसालाच मालवणी माणूस नको असतो असं म्हटलं होतं. 'आदेश बांदेकर..माझा मित्रच आहे तो. मला रात्री पावणे बारा वाजता त्याच्या 'लक्ष्य' या मालिकेतून काढलं. तेव्हा चॅनेल हेडचं मत होतं, हा कॉमेडी करतो, सिरीयस भूमिका कशी करेल. त्यांचं मत असू शकतं, माझा काही विरोध नाही. पण, बांदेकरांना असं नाही वाटलं, मालवणी मुलगा आहे, आपल्या मालिकेत घेऊया.' असं ते म्हणालेले. आता यावर आदेश बांदेकरांनी मौन सोडलं आहे.