

apurva gore boyfriend
esakal
सध्या मराठी इंडस्ट्रीमध्ये लगीन सराई सुरू आहे. गेल्या काही महिन्यात अनेक कलाकार लग्नबंधनात अडकले तर काहींनी साखरपुडा करत चाहत्यांना आश्चर्याचा धक्का दिला. तर काहींनी आमचं ठरलंय असे फोटो शेअर करत चाहत्यांना कोड्यात टाकलं. दोन दिवसापूर्वीच 'आई कुठे काय करते' मधून घरातघरात पोहोचलेली लोकप्रिय अभिनेत्री अपूर्वा गोरे म्हणजेच मालिकेतील ईशा हिने आपल्या प्रेमाची कबुली दिली. तिने तिच्या होणाऱ्या नवऱ्यासोबत काही फोटो शेअर केले. तिची गुड न्यूज ऐकून सगळ्यांनीच तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला. आता तिच्या होणाऱ्या नवऱ्याचा चेहरा पाहून नेटकरी शॉक झालेत.