

Aamchya Pidhichi Goshtach Vegli Live Trailer
esakal
Marathi Entertainment News : मराठी रंगभूमीवर एक आगळावेगळा आणि धाडसी प्रयोग नुकताच यशस्वीरित्या पार पडला. ‘आमच्या पिढीची गोष्टच वेगळी!’ या आगामी नाटकाचा ट्रेलर पहिल्यांदाच थेट रंगमंचावर लाईव्ह परफॉर्मन्सच्या स्वरूपात सादर करण्यात आला आणि प्रेक्षकांनी त्याला टाळ्यांच्या कडकडाटात जबरदस्त प्रतिसाद दिला. महाराष्ट्र दिनी म्हणजेच १ मे रोजी माटुंगा पश्चिम येथील यशवंतराव नाट्यगृहात रंगलेल्या ‘जर तर ची गोष्ट’ या गाजलेल्या नाटकाच्या ३५० व्या प्रयोगादरम्यान हा अनोखा लाईव्ह ट्रेलर सादर करण्यात आला. नाटकाच्या मध्यंतरात कलाकारांनी रंगमंचावर येत ‘आमच्या पिढीची गोष्टच वेगळी!’ची झलक जिवंत अभिनयातून उभी केली. संगीत, प्रकाशयोजना आणि प्रभावी सादरीकरणाच्या माध्यमातून सादर झालेला हा ट्रेलर प्रेक्षकांना नाटकाचा प्रत्यक्ष अनुभव देणारा ठरला.