फाळके फिल्म्स एण्टरटेन्मेंट प्रॉडक्शन आणि अजिंक्य फाळके दिग्दर्शित ‘इलू इलू’ या चित्रपटाची सध्या बरीच चर्चा सुरू आहे. नुकताच या चित्रपटाचा शानदार प्रीमियर सोहळा बॉलीवूड अभिनेता आमिर खान यांच्या उपस्थितीत दिमाखात संपन्न झाला. मराठी चित्रपटसृष्टीतील अनेक मान्यवरांनी या प्रिमियर सोहळ्याला आवर्जून हजेरी लावली. हा चित्रपट 31 जानेवारीला प्रेक्षकांना पहायला मिळणार आहे.