
Bollywood News : कयामत से कयामत तक हा बॉलिवूडमधील एक गाजलेला सिनेमा. आमिर खान आणि जुही चावला यांची या सिनेमात मुख्य भूमिका होती. अजूनही हा सिनेमा प्रेक्षकांच्या मनावर राज्य करतो. बॉलिवूडच्या इतिहासातील क्लासिक रोमँटिक सिनेमा असलेल्या हा सिनेमा रेड लॉरी फिल्म फेस्टिव्हलमध्ये प्रदर्शित करण्यात आला. यावेळी आमिर खान त्याचा भाऊ आणि दिग्दर्शक मन्सूर खान यांनी हजेरी लावली होती. यावेळी आमिरने या सिनेमाविषयीचे अनेक किस्से उघड केले.