Aamir Khan: "मुसलमान असल्यामुळे मला नमस्कार करण्याची सवय नव्हती पण..."; आमिरनं सांगितला पंजाबमधील 'तो' किस्सा

Aamir Khan: आमिरनं पंजाबमध्ये (Punjab) दंगल (Dangal) या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान आलेल्या अनुभवाबद्दल सांगितलं.
Aamir Khan
Aamir Khanesakal

Aamir Khan: बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान (Aamir Khan) हा त्याच्या अभिनयानं प्रेक्षकांची मनं जिंकतो. आमिरच्या विविध विषयांवर आधारित असणाऱ्या चित्रपटांना प्रेक्षकांची विशेष पसंती मिळाली. आमिरनं नुकतीच कपिल शर्माच्या 'द ग्रेट इंडियन कपिल शो' (The Great Indian Kapil Show) या कार्यक्रमात हजेरी लावली. या कार्यक्रमामध्ये आमिरनं विविध किस्से सांगितले. तसेच आमिरनं पंजाबमध्ये (Punjab) दंगल (Dangal) या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान आलेल्या अनुभवाबद्दल देखील सांगितलं.

आमिरनं सांगितला पंजाबमधील किस्सा

आमिरनं कपिल शर्माच्या शोमध्ये दंगल चित्रपटाच्या शूटिंगदरम्यानचा एक किस्सा सांगितला. तो म्हणाला, "पंजाबमध्ये रंग दे बसंती चित्रपटाचं शूटिंग मी केलं, पंजाबमधील लोक खूप प्रेमळ आहेत. मी दंगल या चित्रपटाचं शूटिंग देखील पंजाबमधील एका गावात केलं. आम्ही तिथे जवळपास दोन महिने शूटिंग करत होतो.सकाळी पाच वाजता मी शूटिंगच्या लोकेशनला जायचो. त्यावेळी त्या गावातील लोक सकाळी घराबाहेर येऊन माझं हात जोडून स्वागत करत होते.

"माझं पॅक-अप झाल्यानंतर देखील ते लोक घराबाहेर येऊन मला हात जोडून नमस्कार करायचे. मी मुसलमान कुटुंबातला आहे. त्यामुळे मला हात जोडून नमस्कार करण्याची सवय नाही. पण पंजाबमध्ये गेल्यानंतर दोन महिन्यात मला हात जोडून नमस्कार करण्याची पावर कळाली.", असंही आमिरनं सांगितलं. आमिरचा हा किस्सा ऐकल्यानंतर प्रेक्षकांनी टाळ्यांचा कडकडाट केला.

Aamir Khan
Aamir Khan : आणि 'महाराष्ट्र बंद' ने पालटलं आमिरचं नशीब

आमिरनं त्याचा लाल सिंग चड्ढा हा चित्रपट 2022 मध्ये रिलीज झाला. तसेच त्यानं सलाम वेंकी या चित्रपटात देखील एक छोटीशी भूमिका साकारली होती. आता आमिर आणि सनी देओल यांचा लाहोर 1947 हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येण्यासाठी सज्ज झाला आहे. या चित्रपटाचं दिग्दर्शन राजकुमार संतोषी करणार आहेत तर या चित्रपटाची निर्मिती आमिर करणार आहे. प्रेक्षक आमिरच्या आगामी प्रोजेक्ट्सची उत्सुकतेने वाट बघत आहेत.

Aamir Khan
Aamir Khan: इम्रान खान करणार कमबॅक,भाच्यासाठी अमिर करणार असे काही की...!

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com