

AARTI SOLANKI
ESAKAL
'फू बाई फू' सारख्या कार्यक्रमातून प्रेक्षकांना आपलंसं करणारी, त्यांना पोट भरून हसवणारी लोकप्रिय अभिनेत्री आरती सोलंकी सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे. अनेक वर्षांच्या अंतरानंतर तिने सिनेसृष्टीत कमबॅक केलंय. तिने तिचं वजन कमी केल्यामुळे ती चर्चेत आहे. सोबतच तिच्या वैयक्तिक आयुष्यातील एका घटनेची सोशल मीडियावर चर्चा आहे. ती म्हणजे आरतीच्या आईवडिलांचा संघर्ष. लग्न केल्यानंतर काही वर्षांनी तिच्या आई वडिलांनी वेगळं राहण्याचा निर्णय घेतला. मात्र त्यामागे भांडण हे कारण नव्हतं.