छत्रपती संभाजी महाराज यांच्यावर आधारित 'छावा' चित्रपट प्रचंड गाजला. या चित्रपटाने अनेक रेकॉर्ड ब्रेक केले. अनेक दिवस हा चित्रपट हाऊसफुल्ल होता. प्रत्येकांना हा सिनेमा खूप भावला. अनेकांच्या मनात या चित्रपटाने वेगळं स्थान निर्माण केलं. आता 'छावा' चित्रपट दुसऱ्या भाषेतही प्रदर्शित होत आहे. फक्त भारतात या चित्रपटाने 600 कोटींचा गल्ला कमावला आहे. हे सगळं असलं तरी काही कलाकरांना हा चित्रपट हवा तसा भावला नाही.