मी त्याचा बाप आहे... व्हायरल व्हिडीओमुळे होणाऱ्या टीकेवरून आस्ताद काळेचे वडील संतापले; म्हणाले- माजोरडा आहे म्हणता मग...

AASTAD KALE FATHER SLAMMED TROLLERS: मराठी अभिनेता आस्ताद याच्यावर होणाऱ्या टीकेमुळे त्याचे वडील चांगलेच संतापले आहेत. योग्य वागूनही माझ्या मुलाला बोल लावत असतील तर मी ऐकून घेणार नाही असं ते म्हणालेत.
astad kale father controversy 

astad kale father controversy 

esakal

Updated on

मराठमोळा अभिनेता आस्ताद काळे याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. सध्या तो 'सविता दामोदर परांजपे' या मराठी नाटकात काम करतोय. सांस्कृतिक कलादर्पण व्यावसायिक नाट्य महोत्सवात या नाटकाचा प्रयोग सुरू होता. प्रयोगादरम्यान एक व्यक्त फोनवर जोरजोरात बोलत होता. तेव्हा आस्तादने प्रयोग थांबवून त्या व्यक्तीला सुनावलं होतं. आम्ही तुमच्या जागी फोनवर बोलतो, तुम्ही इथे येऊन नाटक सादर करा, असं तो म्हणाला. मात्र आस्तादचं वागणं योग्य असूनही सोशल मीडियावर त्याच्यावर टीका होत आहे. त्यावर आता आस्तादचे वडील प्रमोद काळे यांनी टीकाकारांना शेलक्या शब्दात समाज दिलीये.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com