
Abhijat Marathi OTT Platform Launched By CM Devendra Fadanvis
Marathi Entertainment News : मराठी भाषेचं सामर्थ्य, तिचं जतन, प्रचार आणि प्रसार करण्याच्या उद्देशाने वेगवेगळ्या संकल्पना राबविल्या जात असताना तंत्रज्ञानाचा हात धरून मराठी ही ज्ञानार्जन आणि अर्थाजनची भाषा व्हावी या उद्देशाने सुमन एंटरटेनमेंटने ‘अभिजात मराठी’ या ओटीटी प्लॅटफॉर्मची मुहूर्तमेढ रोवली. 'अभिजात मराठी' या ॲप चा लोकार्पण सोहळा नुकताच महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज्याचे मराठी भाषा मंत्री श्री. उदयजी सामंत यांच्या हस्ते संपन्न झाला.