'बिग बॉस मराठी' फेम अभिजीत बिचुकले नेहमीच त्याच्या अजिब वक्तव्यामुळे चर्चेत असतात. ते नेहमीच आपली मतं अगदी बिनधास्त आणि ठामपणे मानत असतात. त्याचा आत्मविश्वास हा नेहमीच लोकांचं मनोरंजन करत असतो. बिचुकले हे राजकारणातही नेहमी सक्रीय असलेले दिसतात. सध्या महाराष्ट्रात मराठी -हिंदी भाषेवरुन राजकारण सुरु आहे. अशातच आता बिचुकलेंनी स्वत:ला शिवरायांचा वंशज मीच असल्याचं म्हटलय. टीव्ही 9 मराठीशी बोलताना त्यांनी हे वक्तव्य केलय.