ABHINAY BERDE OPENS UP ABOUT CAREER
esakal
Abhinay Berde Interview : गेल्या आठवड्यात बॉक्स ऑफिसवर चर्चेत असलेले सिनेमे अवतार, आणि धुरंधर प्रदर्शित झाले. या सिनेमाला प्रेक्षकांचा भरभरुन प्रतिसाद मिळत आहे. परंतु या सगळ्यात एक मराठी सिनेमा बॉक्स ऑफिसवर हवा करताना पहायला मिळतोय. बॉलिवूड आणि हॉलिवूडच्या वादळात मराठी सिनेमा 'उत्तर' प्रेक्षकांच्या पसंतीत उतरताना पहायला मिळतोय. या सिनेमामध्ये रेणुका शहाणे आणि अभिनय बर्डे हे प्रमुख भूमिकेत असून आई मुलाच्या नात्यावरील हा सिनेमा चांगला प्रतिसाद मिळालाय.