

Aditya Roy Kapoor Upcoming Horror Movie
esakal
Bollywood News : हिंदी चित्रपटसृष्टीतील आघाडीचा निर्माता-दिग्दर्शक करण जोहर आता नव्या वाटेवर पाऊल टाकताना दिसत आहे. रोमँटिक, कौटुंबिक आणि भव्य व्यावसायिक चित्रपटांसाठी ओळखला जाणारा करण आता लवकरच थरारक भयपट घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याची चर्चा रंगली आहे. या आगामी प्रोजेक्टसाठी अभिनेता आदित्य रॉय कपूरची निवड करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे.