

Akshay Kumar New Movie
esakal
Entertainment News : बॉलिवूडचा ॲक्शन स्टार अक्षय कुमार लवकरच एका वेगळ्या धाटणीच्या चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्याच्या आगामी 'सामुक' या सायन्स-फिक्शन एलियन थ्रिलर चित्रपटाची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे. कनिष्क वर्मा यांच्या दिग्दर्शनाखाली तयार होणाऱ्या या चित्रपटाची निर्मिती अक्षय कुमार, विपुल अमृतलाल शाह आणि आशिन शाह संयुक्तपणे करत आहेत.