
Bollywood News : अभिनेते अमिताभ बच्चन यांना बॉलिवूडमधील सगळ्यात उत्तम अभिनेते म्हणून ओळखलं जातं. आतापर्यंत त्यांनी अनेक ब्लॉकबस्टर सिनेमे बॉलिवूडला दिले आहेत. त्यांच्या अभिनयाचे, स्टाईलचे लाखो चाहते आहेत. पण बॉलिवूडमध्ये येण्याआधी अमिताभ यांनी वेगवेगळ्या नोकऱ्या केल्या आहेत.त्यांची जुनी पोस्ट व्हायरल झालीये. त्यावेळी त्यांनी त्याच्या पहिल्या नोकरीबद्दल सांगितलं.