ASHOK SARAF AND SACHIN PILGAONKAR DANCE VIRAL VIDEO
esakal
ASHOK SARAF AND SACHIN PILGAONKAR DANCE TOGETHER: मराठी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध कलाकार अशोक सराफ आणि सचिन पिळगांवकर या जोडीला प्रत्येकजण ओळखतं. त्यांच्या अभिनयाचे लाखो चाहते आहेत. लक्ष्मीकातं बर्डे, अशोक सराफ आणि सचिन पिळगांवकर यांचं त्रिकुट प्रत्येक सिनेमात असायचं. मैत्रीचे किस्से सांगताना त्यांचं आवर्जुन नाव घेतलं जायचं. सेटवर एकमेकांचे यार असलेले अशोकमामा आणि सचिन पिळगांवकर खऱ्या आयुष्यातही त्यांच्या मैत्रीचे अनेक किस्से आहेत. चाहत्यांना नेहमीच त्यांच्या मैत्रीचा हेवा वाटतो.