

Entertainment News : ओटीटी विश्वात काही वेबसीरिज केवळ लोकप्रिय ठरत नाहीत, तर कलाकारांच्या करिअरलाही नवं वळण देतात. प्रकाश झा दिग्दर्शित ‘आश्रम’ ही त्यापैकीच एक सीरिज ठरली. बॉबी देओलसाठी करिअरचा टर्निंग पॉइंट ठरलेल्या या सीरिजने तीन यशस्वी सिझननंतर प्रेक्षकांची अपेक्षा अधिक वाढवली आहे.