kannada actor darshan in jailesakal
Premier
Actor Darshan : कन्नड अभिनेता दर्शनचे सरकारी लाड संपेनात! आता तुरुंगात केली मोठ्या टीव्हीची सोय
कन्नड अभिनेता दर्शन हा सध्या आपल्याच एका चाहत्याच्या अपहरण आणि खूनाच्या आरोपाखाली सध्या तुरुंगात आहे.
नवी दिल्ली : कन्नड अभिनेता दर्शन हा सध्या आपल्या चाहत्याचं अपहरण आणि खूनाच्या आरोपाखाली सध्या तुरुंगात आहे. यापूर्वी त्याला तुरुंगात अनेकदा व्हीआयपी ट्रिटमेंट देण्यात आल्यानं खळबळ उडाली होती. पण आता त्याला तुरुंगातील त्याच्या सेलमध्ये चक्क टीव्ही पाहण्याची सोयही करण्यात आली आहे. त्यामुळं या आरोपी अभिनेत्याचे सरकारी लाड काय कमी होताना दिसत नाहीत.