
Entertainment News : धनुष आणि नयनतारा यांच्यामध्ये सुरु असलेल्या कॉपीराईट केसमध्ये धनुषचा विजय झाला. ओटीटी प्लॅटफॉर्म नेटफ्लिक्सने जी याचिका मद्रास हायकोर्टात दाखल केली होती ती मंगळवारी कोर्टाने फेटाळली. या याचिकेत धनुषने अभिनेत्री नयनताराविरुद्ध दाखल केलेला कॉपीराईट उल्लंघनाचा खटला रद्द करावा अशी मागणी करण्यात आली होती.