महाराष्ट्रात मुलांसाठी हिंदी भाषा शिकणं सक्तीचं करण्यात आलं होतं. परंतु ठाकरे बंधुंनी या निर्णयाला कडाडून विरोध केला होता. काँग्रेस पक्षाकडून सुद्धा या निर्णयाला विरोध करण्यात आला. मराठी भाषेवरुन महाराष्ट्रात प्रचंड राजकारण पेटलं. मराठी भाषेसाठी तब्बल 19 वर्षानंतर ठाकरे बंधु एकत्र पहायला मिळाले. दरम्यान अशातच एका अभिनेत्याने चक्क राज आणि उद्धव ठाकरेंना चॅलेंज दिलय. 'मला मराठी बोलता येत नाही. दम असेल तर मला महाराष्ट्रातून काढून दाखवा' असं तो अभिनेता म्हणालाय.