Govinda: 'हिरो नंबर १' योगींच्या दरबारी! गोविंदाने CMना दिलं असं खास गिफ्ट की फोटो झाले व्हायरल, राजकारणात करणार कमबॅक?

Govinda Meets Yogi Adityanath: फ्लॉपनंतर कमबॅकच्या तयारीत असलेला गोविंदा पोहोचला मुख्यमंत्री योगींच्या भेटीला; भेटीचे फोटो व्हायरल
govinda meets yogi adityanath

govinda meets yogi adityanath

esakal

Updated on

बॉलीवूडचा 'हिरो नंबर १' अर्थात अभिनेता गोविंदा सध्या चांगलाच चर्चेत आहे. बऱ्याच काळापासून रुपेरी पडद्यापासून दूर असलेला गोविंदा आता एका खास कारणामुळे चर्चेत आला आहे. नुकतीच त्याने उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची भेट घेतली असून या भेटीचे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत.

गोविंदाने शनिवारी लखनौमध्ये मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या सरकारी निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतली. या भेटीदरम्यान दोघांमध्ये सिनेमा आणि सामाजिक विषयांवर बरीच चर्चा झाल्याचे समजते. गोविंदाने या भेटीचा फोटो स्वतःच्या इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. यामध्ये तो मुख्यमंत्री योगींना भगवान श्रीकृष्णाची एक अतिशय सुंदर मूर्ती भेट म्हणून देताना दिसत आहे. योगी आदित्यनाथ यांच्यासोबत वेळ घालवणे हा एक अद्भुत अनुभव होता, अशा शब्दांत गोविंदाने आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com