
Keir Starmer Announced Big Budget Bollywood Movie Shoot In Britain
Bollywood News :भारताची आघाडीची चित्रपट निर्मिती आणि वितरण कंपनी यशराज फिल्म्स (YRF) ने जाहीर केले आहे की ते २०२६ पासून आपले तीन प्रमुख चित्रपट युनायटेड किंगडममध्ये (UK) चित्रित करणार आहे. या निर्णयामुळे 3,000 हून अधिक रोजगारनिर्मिती होईल आणि ब्रिटनच्या अर्थव्यवस्थेला कोट्यवधी पौंडांचा फायदा होणार आहे, अशी घोषणा ब्रिटनचे पंतप्रधान कीर स्टार्मर यांनी आज मुंबईत केली.