
Marathi Entertainment News : छावा सिनेमा सगळीकडे चर्चेत आहे. सिनेमाला प्रदर्शित होऊन येत्या दोन दिवसात महिना पूर्ण होईल तरीही बॉक्स ऑफिसवर या सिनेमाची यशस्वी घोडदौड सुरु आहे. या सिनेमात कलाकारांनी साकारलेली प्रत्येक भूमिका गाजली. अनेक मराठी कलाकारांनी या सिनेमात काम केलं होतं. त्यातीलच एक कलाकार म्हणजे अभिनेता संतोष जुवेकरने रायाजीची भूमिका अनेकांना आवडली. नुकत्याच एका मुलाखतीत संतोषने सिनेमात औरंगजेबाची भूमिका साकारणाऱ्या अक्षय खन्नाकडे पाहिलंही नव्हतं असं वक्तव्य केलं.