
Marathi Entertainment News : काल काश्मीरमधील पहलगाम भागात दहशतवाद्यांनी हल्ला करत पर्यटकांना ठार केले. यात 28 पर्यटक ठार झाले तर काही जखमी झाले आहेत. या दहशतवाद्यांनी लोकांना मारण्यापूर्वी त्यांचा धर्म विचारल्याचं त्या हल्ल्यातून वाचलेल्या नागरिकांचं म्हणणं आहे. त्यामुळे पुन्हा एकदा सोशल मीडियावर धार्मिक राजकारणाने पेट घेतला आहे. त्यातच आता मराठी अभिनेत्याने या हल्ल्यातील पीडित तरुणीचा व्हिडीओ शेअर करत भाष्य केलं.