
Marathi Entertainment News : मराठी इंडस्ट्रीबरोबरच आपल्या दमदार अभिनयाने बॉलिवूड गाजवणारे मराठमोळे अभिनेते म्हणजे नाना पाटेकर. नाना यांचे अनेक किस्से लोकप्रिय आहेत. अगदी त्यांचं खासगी आयुष्यही वादग्रस्त ठरलं होतं. नानांच्या पत्नी नीलकांती पाटेकर यासुद्धा अभिनेत्री आहेत. गेली कित्येक वर्षं ही जोडी एकमेकांपासून वेगळे राहतात. याचं कारण नुकतंच नानांनी एका मुलाखतीत सांगितलं.