Prakash Raj: भाजप एन्ट्रीच्या चर्चेवर प्रकाश राज यांनी सोडलं मौन; थेटच म्हणाले, "मला विकत घेण्याइतके..."

Prakash Raj: प्रकाश राज हे आज तीन वाजता भारतीय जनता पार्टी (Bharatiya Janata Party) या पक्षात प्रवेश करणार आहेत, असं म्हटलं होतं.
Prakash Raj
Prakash Rajesakal

Prakash Raj: दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेते प्रकाश राज (Prakash Raj) यांच्या भाजप एन्ट्रीची चर्चा सोशल मीडियावर सुरु होती. प्रकाश राज हे आज तीन वाजता भारतीय जनता पार्टी (Bharatiya Janata Party) या पक्षात प्रवेश करणार आहेत, असं म्हटलं होतं. आता या सर्व चर्चांवर प्रकाश राज यांनी प्रतिक्रिया दिली आहे. नुकतेच प्रकाश राज यांनी ट्वीट शेअर करुन भाजपमधील त्यांच्या एन्ट्रीच्या चर्चेवर मौन सोडलं आहे.

नेटकऱ्याचं ट्वीट

"प्रख्यात अभिनेते प्रकाश राज आज दुपारी 3 वाजता भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत.", असं ट्वीट एका नेटकऱ्यानं शेअर केलं होतं. या ट्वीटला आता प्रकाश राज यांनी रिप्लाय दिला आहे.

प्रकाश राज यांचा रिप्लाय

प्रकाश राज यांनी नेटकऱ्याच्या ट्वीटला रिप्लाय देऊन भाजपमधील त्यांच्या एन्ट्रीच्या चर्चेवर मौन सोडलं आहे. "मला वाटते त्यांनी प्रयत्न केला, पण मला विकत घेण्याइतके ते (वैचारिकदृष्ट्या) श्रीमंत नाहीत, हे त्यांच्या लक्षात आले असावे...तुम्हाला काय वाटते मित्रांनो?", असा रिप्लाय प्रकाश राज यांनी दिला आहे.

भाजपवर प्रकाश राज यांनी केली टीका

प्रकाश राज हे सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेकवेळा भाजपवर तसेच नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करत असतात. प्रकाश राज यांनी काही महिन्यांपूर्वी नरेंद्र मोदी यांचा एक फोटो शेअर केला होता. या फोटोला त्यांनी दिलेल्या कॅप्शननं अनेकांचे लक्ष वेधले होते.

Prakash Raj
Prakash Raj : मोदींनी काळाराम मंदिरात केली स्वच्छता, अभिनेता प्रकाश राज यांचा संताप! 'हे असं करणं म्हणजे...'
Prakash Raj
Prakash Raj : 'मला तीन राजकीय पक्षांकडून ऑफर', सिंघमच्या प्रकाश राज यांनी केला खुलासा!

प्रकाश राज यांचे चित्रपट

प्रकाश राज यांना सिंघम या चित्रपटामुळे विशेष लोकप्रियता मिळाली. या चित्रपटात त्यांनी साकारलेल्या जयकांत शिक्रे या भूमिकेनं प्रेक्षकांचे मनोरंजन केलं. तसेच प्रकाश राज यांनी तेलुगू चित्रपटांमध्ये देखील काम केलं आहे.केजीएफ,वारिसू, वॉन्टेड या चित्रपटांमध्ये देखील प्रकाश राज यांनी काम केलं आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com