

Marathi Entertainment News : हॉरर-कॉमेडीपटांनी नेहमीच रसिकांना भुरळ घातली आहे. चार मित्रांची गोष्ट सांगणारा 'हुक्की' हा आगामी मराठी चित्रपटही क्षणाक्षणाला प्रेक्षकांची उत्कंठा वाढविणारा आहे. 'हुक्की'च्या पहिल्या पोस्टरनंतर या चित्रपटाचा फर्स्ट लुक नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. दमदार कलाकारांची फौज आणि प्रवाहापेक्षा वेगळा विषय असल्याने 'हुक्की'च्या फर्स्ट लुकने प्रदर्शित झाल्यापासूनच रसिकांचे लक्ष वेधले आहे.