
Beed : बीड जिल्ह्यातील मस्साजोग येथील माजी सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येमुळे संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडालीय. काही महिन्यांपासून सुरु असलेल्या प्रकरणाचा काही निकाल लागत नसल्यामुळे आधीच संतप्त वातावरण निर्माण झालं आहे. त्यातच त्यांच्या हत्येचे मन हेलावून टाकणारे फोटो समोर आल्यानंतर अनेकांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रतिक्रिया व्यक्त केल्या.