
Latest News : अभिनेता राजकुमार रावने न्यूटन, स्त्री, बरेली की बर्फी असे एकापेक्षा एक उत्तमोत्तम चित्रपट केलेले आहेत. त्याचे चित्रपट वेगळ्या धाटणीचे आणि निराळ्या पठडीतील असतात. हिंदी चित्रपटसृष्टीतील तो एक सर्जनशील व चाणाक्ष अभिनेता आहे. त्याने आतापर्यंत केलेल्या चित्रपटांवरून त्याची सर्जनशीलता दिसून येते. परंतु आता त्याचा प्रदर्शित झालेला 'मालिक' चित्रपट त्याने का केला असावा, असा प्रश्न मनामध्ये निर्माण होतो. कारण या चित्रपटाची कथा जुन्या वळणाची आहे आणि आतापर्यंत अशा कथानकावरील चित्रपट कित्येक आलेले आहेत. त्यामुळे नवीन असे काही या चित्रपटामध्ये पाहायला मिळत नाही.