
Bollywood News : बॉलिवूड अभिनेता राजपाल यादव यांचे वडील नौरंग लाल यादव यांचं निधन झालं. त्यांचं वय 80 वर्षं होतं. 23 जानेवारी रात्री गुरुवारी उशिरा दिल्लीतील एम्स हॉस्पिटलमध्ये त्यांचं निधन झालं. शुक्रवारी सकाळी त्यांच्या गावी कुंडरा येथे त्यांचं पार्थिव शरीर आणलं गेलं. शनिवार 25 जानेवारीला सकाळी 10 वाजता त्यांच्या पार्थिवावर अंतिम संस्कार पार पडले.