

Entertainment News : भारतीय चित्रपटसृष्टीतील अत्यंत महत्त्वाकांक्षी आणि बहुप्रतिक्षित प्रकल्पांपैकी एक असलेल्या ‘रामायण’ या चित्रपटाची प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता आहे. नितेश तिवारी यांच्या दिग्दर्शनाखाली तयार होत असलेला 'रामायण: पार्ट १' हा चित्रपट आधी दिवाळीच्या मुहूर्तावर ६ नोव्हेंबर २०२६ रोजी प्रदर्शित केला जाणार होता; मात्र आता या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख एक आठवडा आधी निश्चित केली जाण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे.