

Bollywood News :होम्बले फिल्म्स आणि ऋषभ शेट्टी यांची कांतारा: चैप्टर 1 या चित्रपटाने भारतीय सिनेमा आणि कथा सांगण्याच्या शैलीला नव्याने परिभाषित केले आहे. सुमारे महिनाभरापूर्वी प्रदर्शित झालेला हा चित्रपट आता जागतिक स्तरावर गाजतो आहे. आपल्या अद्भुत दृश्यप्रभावांनी आणि लोककथांना जिवंत करणाऱ्या अनोख्या सादरीकरणामुळे प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करत आहे. रिलीज झाल्यापासूनच या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवरील सर्व विक्रम मोडले आहेत आणि पहिल्या भागाच्या तुलनेत दुप्पट कमाई केली आहे. दिवाळीच्या काळात हा चित्रपट सर्वात मोठा विजेता ठरला आहे.