

Salman Khan Face Legal Trouble For Endorsing Misleading Ads
esakal
Bollywood News : बॉलिवूड अभिनेता सलमान खान पुन्हा एका नव्या कायदेशीर अडचणीत अडकला आहे. कोटा जिल्हा ग्राहक संरक्षण न्यायालयात ग्राहकांची दिशाभूल केल्याबद्दल सलमान खानविरुद्ध तक्रार दाखल करण्यात आली आहे. एएनआय संस्थेने दिलेल्या वृत्तानुसार, सलमानने ग्राहकांची दिशाभूल करणाऱ्या पान मसाला ब्रँडची जाहिरात करून प्रचार केल्याबद्दल त्याला नोटीस बजावली आहे. सलमान आणि सदर पानमसाला उत्पादक या दोघांकडूनही उत्तर न्यायालयाने मागितले आहे.