
Marathi Entertainment News : मराठी इंडस्ट्रीमधील एक लाडकं कपल म्हणजे सौरभ चौघुले आणि योगिता चव्हाण. जीव माझा गुंतला या मालिकेतून घराघरात पोहोचलेली जोडी मालिका संपल्यानंतर लगेच लग्नबंधनात अडकली. काही महिन्यांपूर्वी त्यांचं लग्न झालं. ख्रिसमसचा सण सगळीकडे उत्साहाने साजरा केला जातोय आणि सौरभनेही ख्रिसमस निमित्ताने योगिताला खास सरप्राईज दिलं.