

Shantanu Moghe On Mohini Serial Action Scene
esakal
Marathi Entertainment News : कलर्स मराठीवरील ‘मोहिनी’ मालिकेत सध्या प्रेक्षकांना खिळवून ठेवणारा थरारक अॅक्शन ट्रॅक पाहायला मिळत आहे. मोहिनी आणि तिचे वडील महेंद्र (शंतनू मोघे) यांच्यातील झालेले फाईट सीक्वेन्स हे केवळ अॅक्शनपुरते मर्यादित न राहता नात्यांमधील संघर्ष, भावना आणि एक बाप आपल्या मुलीला सक्षम बनवण्याचा प्रयत्न याचे प्रभावी चित्रण करत आहेत. या सीनमुळे मालिकेची रंगत अधिकच वाढली असून प्रेक्षकांमध्ये उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.