

Actor Sharad Ponkshe Give Advise To Gen Z
esakal
Marathi Entertainment News : प्रा. वसंत कानेटकर लिखित आणि राजेश देशपांडे दिग्दर्शित 'हिमालयाची सावली' हे अजरामर नाटक पुन्हा एकदा मराठी रंगभूमीवर अवतरले आहे. मोरया भूमिका आणि अथर्व निर्मित हे नाटक समाजासाठी सर्वस्व अर्पण करणाऱ्या 'हिमालयाच्या' पाठीशी उभ्या राहिलेल्या 'सावली'चे, म्हणजेच त्यांच्या पत्नीचे, मन हेलावून टाकणारे आयुष्य दर्शवणारे आहे. या महत्त्वपूर्ण भूमिकेत ज्येष्ठ अभिनेते शरद पोंक्षे आणि अभिनेत्री शृजा प्रभूदेसाई असून, पोंक्षे यांनी नाटकाच्या भावनिक गाभ्यावर आणि आजच्या तरुण पिढीसाठी असलेल्या त्याच्या महत्त्वाबद्दल मनमोकळेपणाने भाष्य केले आहे. या नाटकात विघ्नेश जोशी, जयंत घाटे, सृजन देशपांडे, प्राची रिंगे, सोनाली राजे, चैतन्य राव, ओंकार कर्वे आणि विजय मिरगे या कलाकारांचा समावेश आहे.